काँग्रेस बदलणार अनेकराज्यांचे प्रदेशाध्यक्ष, दुसऱ्या टप्प्यातील संघटनात्मक बदलांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:18 IST2020-11-01T01:25:28+5:302020-11-01T06:18:58+5:30
Congress : उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणाऱ्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे.

काँग्रेस बदलणार अनेकराज्यांचे प्रदेशाध्यक्ष, दुसऱ्या टप्प्यातील संघटनात्मक बदलांची तयारी
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : दुसऱ्या टप्प्यातील संघटनात्मक बदलांची तयारी काँग्रेसने चालविली असून याअंतर्गत अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणाऱ्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. बिहार निवडणुकीनंतर लगेचच हे बदल करण्यात यावेत, असे काही नेत्यांना वाटते. याउलट काही नेत्यांचे म्हणणे आहे की, जानेवारी अखेरपर्यंत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे.