शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:34 IST

झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई: भाजपतून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. हा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, एकनाथ खडसेंना त्रास देण्यासाठी झोटिंग समितीचा फास केल्याची टीका केला आहे. (congress nana patole criticised devendra fadnavis over zoting committee for eknath khadse)

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांना एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांवर चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल गायब झाल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

“कोण कौरव, कोण पांडव हे त्यांनीच ठरवावं”; पंकजा मुंडेंना काँग्रेसचा टोला

 हा एक फास होता का? 

देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. तसेच भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा बहुजन विरोधी, OBC विरोधी पक्ष आहे, असल्याचा दावा करत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. 

आगामी निवडणुकांसाठी RSS ची तयारी सुरू; आता मुस्लीम बहुल भागांतही सुरु करणार शाखा!

पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे

महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझे वाक्य तोडून मोडून दाखवले. मी काही चुकीचे बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे. कार्यकर्त्याचे गाऱ्हाणे ऐकणे माझे काम आहे, असे सांगत पण मला विरोध का होतो, हे माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल हा २०१७ मध्येच आला होता. मात्र, हा अहवाल समोर आणण्यात आला नाही. झोटिंग समितीवर ४५ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. तसेच एक वर्षाचा वेळ लागला होता. या समितीसमोर खडसे हजर राहिले होते. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत हा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसे