शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

प्रशासनातले 'ते' अधिकारी रडारवर; काँग्रेसच्या बैठकीत नाराजीचा सूर; मुख्यमंत्र्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:56 IST

congress leaders unhappy on ncp after allegations on anil deshmukh will meet cm uddhav thackeray: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं. या पत्राचे पडसाद थेट संसदेपर्यंत उमटले. (congress leaders unhappy on ncp after allegations on anil deshmukh will meet cm uddhav thackeray)परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणीअनिल देशमुख यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांची पाठराखण केली आहे. मात्र काँग्रेसमध्ये या विषयावर दोन गट आहेत. देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा मतप्रवाह असलेला एक गट काँग्रेसमध्ये आहे. तर राजकारणात आरोप होतच असतात. त्यातही पदावरून दूर केल्यानंतर अधिकाऱ्यानं केलेल्या आरोपांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं दुसऱ्या गटाला वाटतं. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्लामहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीबद्दल नाराजी व्यक्त केली. देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांच्यामुळे सरकार अडचणीत आलं आहे. त्यांची चौकशी व्हायला हवी. त्यासाठी त्यांनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. देशमुखांवर झालेल्या आरोपांमुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असं मत बैठकीला उपस्थित असलेल्या एका गटानं मांडलं.अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीकडून शरद पवार मैदानात उतरले आहेत. मात्र पक्षातल्या इतर कोणत्याही नेत्यानं, मंत्र्यानं देशमुख यांची बाजू मांडत त्यांचा बचाव केलेला नाही. त्यामुळेही सरकारबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे, असं मत या गटानं व्यक्त केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील माणसं महत्त्वाच्या पदांवर नेमली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या या अधिकाऱ्यांना आधी महत्त्वाच्या पदांवरून हटवण्यात यावं, अशी मागणी एका गटानं लावून धरली. काँग्रेसचे नेते लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवार