शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 6:53 PM

शिवसेना विरुद्ध कंगना वादात आता वडेट्टीवारांची उडी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेत वाकयुद्ध सुरू आहे. आता या संघर्षात काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी कंगनाला थेट भाजपची पोपट म्हटलं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कंगनावर खोचक शब्दांत टीका केली. कंगना भाजपशी मिळालेली आहे हे मी आधीच सांगितलं होतं, असं म्हणत भाजप कंगनाला देशभक्तीचं प्रमाणपत्र देत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.कंगना राणौत भाजपची भाषा बोलत आहे. उद्या त्या भाजपच्या तिकीटावर राज्यसभेत किंवा विधान परिषदेवरही निवडून जातील आणि त्याचं मला आश्चर्य वाटणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. ज्या मुंबई पोलिसांचं नाव जगात आहे. त्या पोलिसांवर विश्वास नसणाऱ्यांना देशभक्त म्हणून प्रमाणपत्र दिलं जात असून वाय दर्जाची सुरक्षाही दिली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थकाँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील कंगनाला मिळालेल्या सुरक्षेवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं. स्वत:चा अजेंडा रेटणाऱ्यांची काळजी भाजपचं सरकार घेत असतं. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणौतला केंद्राकडून मिळालेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेचं आश्चर्य वाटत नाही, असी टीका सावंत यांनी केली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनीदेखील कंगनावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही. भाजप-संघाची भाषा बोलणाऱ्या कंगनानं महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले...कंगनाच्या कार्यालयाची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणीआज कंगनाच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात आली. कंगनाचं पाली हिलमधील कार्यालय अनधिकृत तर नाही ना, याची तपासणी पालिकेनं सुरू केली आहे. कंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मापं घेतली. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावाकाय आहे प्रकरण?अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

काय म्हणाले संजय राऊत?कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा; कंगनाचे खुले आव्हान"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा