शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 15:19 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. मात्र त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची सूत्रं नेमकी कोणाकडे जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर काहींनी आडमार्गाने विरोध दर्शवला आहे. मात्र महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं, असं मत व्यक्त केलं आहे.

'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सोनिया गांधींनी पक्षाला उभारी दिली. काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं लोकशाही असून गांधी कुटुंबानंच पक्षाचं नेतृत्व करावं. तसेच गांधी परिवाराकडे पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या इच्छेनुसारच काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी राहुल गांधींनी निर्णय घेतला की सरकारमधून बाहेर पडावं तर बाहेर पडू, असं मोठं विधानही विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या देशभरातल्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा, अशी मागणी या नेत्यांनी पत्रात केली. एका बाजूला २३ नेते पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष द्या, अशी मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मात्र राहुल गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

आपण अध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक नाही. त्याऐवजी गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे अध्यक्षपद सोपवण्यात यावं, असं राहुल गांधी यांचं मत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांच्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग किंवा ए. के. अँटनी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात येईल. त्यांच्याकडे सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच अंतरिम अध्यक्षपद दिलं जाईल. कोरोना संकट संपल्यानंतर पक्षाचं अधिवेशन होईल आणि राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे