भाजप खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप; धक्कादायक माहिती उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:03 PM2021-05-14T17:03:21+5:302021-05-14T17:04:09+5:30

फोन टॅपिंग झाले तेव्हा सरकार कोणाचं होतं?; नानांचा सवाल; कारवाईची मागणी

congress leader nana patoles phone tapped in 2017 when he was bjp mp | भाजप खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप; धक्कादायक माहिती उघडकीस

भाजप खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप; धक्कादायक माहिती उघडकीस

Next

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अमजद खान यांच्या नावानं पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला. याशिवाय त्यांच्या ४ सहकाऱ्यांचे फोनदेखील टॅप करण्यात आले अशी माहिती समोर आली. यासंबंधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. फोन टॅपिंग होत असताना त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा सवाल नाना यांनी उपस्थित केला आहे. 

प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य असतं. कोणीही कोणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणाचेही फोन टॅप केले जाऊ शकत नाहीत. महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा प्रयत्न केला जात असून माझा फोन टॅप केला गेला, त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला. 

समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी- सुधीर मुनगंटीवार
२०१७ मध्ये नाना पटोले भाजपचे खासदार होते. त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यांची अवहेलना होता कामा नये. एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या आणि स्वत:च्याही पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करू नयेत. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेऊन चौकशी करण्यात यावी. मी नानांच्या सोबत आहे. अशा प्रकारे कोणाचेही फोन टॅप केले जाऊ नयेत, असं भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
 

Read in English

Web Title: congress leader nana patoles phone tapped in 2017 when he was bjp mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app