शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 09:42 IST

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री पदावरुनही उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटाचिनी कंपनीसोबत केलेल्या कंत्राटावरुन भाजपानं राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतंभाजपाच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पलटवार

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकारण ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. या भाजपा नेत्यांच्या टीकेलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्याचसोबत चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं आहे.

या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे. तसेच काही जणांकडून सध्या चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुन महाराष्ट्राने चिनी कंपनीसोबत करार केल्याचा आरोप केला. त्यावर आता तुम्हाला चीन नको आहे पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि विरोधकांना विचारला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

तर मुख्यमंत्री पदावरुनही भाजपाला चिमटा काढला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी या’साठी’च केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध झाला असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनासाठी ही मुलाखत घेतली आहे. येत्या २५ आणि २६ जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात शिवसेना राज्यभरात वाढवण्याचं स्वप्न कायम आहे या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. तसेच मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो असं सांगत त्यांनी आपल्या स्वभावात मुख्यमंत्री झाल्यानंतरही कुठेही बदल झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाindia china faceoffभारत-चीन तणाव