शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

गांधीनगरचा गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे तगडे आव्हान, तीन दशकांपासून जागा भाजपकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:11 IST

गेल्या तीन दशकांपासून गांधीनगरची जागा ही भाजपच्या ताब्यात आहे.

गांधीनगर : गेल्या तीन दशकांपासून गांधीनगरची जागा ही भाजपच्या ताब्यात आहे. भाजपने यावेळी येथून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेसने येथून दोन वेळा आमदार असलेले सी.जे. चावडा यांना मैदानात उतरविले आहे. भाजपचा हा अभेद्य गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे आव्हान आहे. यापूर्वी नामांकित उमेदवार देऊनही कॉँग्रेसला येथून यश मिळालेले नाही.सहा वेळा सलगपणे गांधीनगरची जागा जिंकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याजागी यंदा भाजपने राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी कॉँग्रेसने येथून काही नामांकित उमेदवारांना उभे करूनही त्यांना विजयश्री संपादन करता आलेली नाही. यापूर्वी कॉँग्रेसने येथून अभिनेते राजेश खन्ना, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन तसेच माजी पोलीस उपमहासंचालक पी. के. दत्ता अशा नामांकित उमेदवारांना येथून लढविले होते. यंदा डॉ. सी. जे. चावडा यांना उमेदवारी दिली आहे. चावडा हे शाह यांच्याविरोधात कितपत प्रभाव पाडू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

जनावरांचे डॉक्टर असलेले चावडा राजकारणात येण्यापूर्वी उपजिल्हाधिकारी होते. ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. चावडा हे ठाकूर समाजाचे असून हा समाज सातत्याने कॉँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. ही लढत अमित शहा विरुद्ध चावडा अशी नसून भाजप विरुद्ध कॉँग्रेस अशी असल्याचे चावडा यांनी सांगितले आहे. कॉँग्रेसचे नेते हे मागील महिन्यामध्ये गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना मिळालेला प्रतिसाद बघता जनतेत भाजपाच्या कारभाराबद्दल राग आहे. तो मतपेटीतून व्यक्त होईल, असे मत कॉँग्रेसचे उमेदवार चावडा यांनी व्यक्त केले आहे.
>सर्वाधिक मतदारगांधीनगर मतदारसंघ हा गुजरातच्या २६ मतदारसंघांमधील सर्वाधिक मतदारसंख्येचा आहे. येथे १९.२१ लाख मतदारांनी नावनोंदणी केली आहे. ही गुजरातमधील सर्वाधिक मतदारसंख्या आहे. यात पाटीदार मतदार सर्वाधिक असून त्यापाठोपाठ ठाकूर समाजाचे मतदान आहे. या मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी पाच जागा भाजप कडे तर निमशहरी भागात दोन जागा कॉँग्रेसकडे आहेत. ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व वाजपेयी आणि अडवाणी यांनी केले आहे, त्यामधून मला उमेदवारी करता येणे, हे मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिली होती. शहा यांचा येथे चांगला संपर्क आहे. यापूर्वी ते चार वेळा आमदार होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाgandhinagar-pcगांधीनगर