शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

केंद्राने जीएसटीबाबत शब्द पाळला नाही; प्रफुल्ल पटेल यांचा मोदी सरकारवर घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 03:06 IST

करदात्यांच्या हिताचा आयकर विभागाने विचार करावा

नितीन अग्रवालनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र सरकारवर वस्तू आणि सेवा कराबाबत (जीएसटी) राज्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप केला आहे. पटेल यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना राज्यसभेत जीएसटी महसुलात राज्यांचा थकलेला वाटा आणि पेट्रोलच्या किमतीचा मुद्दा उपस्थित केला.

पटेल म्हणाले, जीएसटी राज्यांच्या महसुलाचा मुख्य आधार असून महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना जीएसटी अंशदान विलंबाने मिळत आहे. जीएसटी लागू करताना सरकारने स्पष्ट आश्वासन दिले होते की, राज्यांची स्थिती बिघडू दिली जाणार नाही. परंतु, तसे झालेले नाही. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकसारख्या राज्यांना जे आश्वासन दिले होते ते पाळले जावे.

पटेल यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा मुद्दा उपस्थित करून म्हटले की, कराचा दर किंमत वाढल्यास करही वाढतो. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची कमाई वाढते परंतु, जनतेवर दुहेरी ओझे पडते. आज पेट्रोल लिटरला जवळपास १०० रूपये झाले आहे. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त भाग हा फक्त कर आहे. पटेल यांनी सूचना केली की, जर पेट्रोलवर कराऐवजी मूल्य निश्चित केले गेल्यास पेट्रोलचा भाव कमी होऊन लोकांना हायसे वाटेल.

पटेल यांनी देशात आधारभूत व्यवस्था असावी यावर भर देत म्हटले की, याचा अर्थ फक्त रस्ते बांधणे असा नाही. आज पेट्रोलद्वारे वसूल केला जात असलेला सेस रस्ते निर्मितीत खर्च केला जात आहे. परंतु, वीज, पाणी आणि स्वच्छतेवर कमी लक्ष दिले जात आहे. शहरांच्या गरजा भागवण्यासाठी फार कमी पैसा खर्च केला जात आहे.

व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी प्रफुल्ल पटेल यांनी आयकर विभागाच्या उणिवांवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ९९.९९ प्रकरणांत जेथे करविवाद निवारणासाठी बनवल्या गेलेल्या लवादाकडून करदात्याच्या बाजूने निर्णय होतो तेव्हा उच्च न्यायालयात अपिल केले जाते. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही विभाग प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेतो. या व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे, असे पटेल म्हणाले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलCentral Governmentकेंद्र सरकारGSTजीएसटीNCPराष्ट्रवादी काँग्रेस