शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी राज्याची मुख्यमंत्री; शरद पवारांसमोर आशिष शेलारांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 06:44 IST

Ashish Shelar News: मुंबई भाजपमधील मोठे नेते मानले जाणारे आशिष शेलार सध्या बाजूला पडल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यकारिणीची बैठक झाली. यात पालिका निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली. या महत्त्वाच्या बैठकीला शेलार अनुपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुुंबई : महाराष्ट्राची मुख्यमंत्री कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग समाजात आहे. याला माझ्यासारख्या माणसाचेसुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असे वक्तव्य करीत भाजप नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतच शेलार यांच्या या शाब्दिक फटकेबाजीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

पत्रकार विजय चोरमारे लिखित ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर महाराव यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा केला. यानंतर पुस्तकावरील आपल्या भाषणात शेलार यांनी महारावांच्या या वक्तव्याला उत्तर देताना ‘कर्तृत्ववान मराठी स्त्री राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आल्यास आपले शंभर टक्के समर्थन असेल,’ असे विधान केले. पवारांच्या उपस्थितीतील या विधानानंतर शेलार यांचा रोख सुप्रिया सुळे यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकाचवेळी महाविकास आघाडीसह भाजपलाही त्यांनीएक प्रकारे इशारा दिल्याचे मानलेजात आहे.

शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरेच लोक बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत. मला कुणाशी तुलना करायची नाही, असेही शेलार या वेळी म्हणाले. या विधानाचा रोख कुणाकडे, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

कार्यकारिणीच्याबैठकीत अनुपस्थितमुंबई भाजपमधील मोठे नेते मानले जाणारे आशिष शेलार सध्या बाजूला पडल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यकारिणीची बैठक झाली. यात पालिका निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली. या महत्त्वाच्या बैठकीला शेलार अनुपस्थित होते. पक्षाने हैदराबादचे सहप्रभारी पद दिल्याने तेथील बैठकीसाठी ते हैदराबाद येथे असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे भाजप नेते, कार्यकर्ते वीज बिलाच्या प्रश्नावर आंदोलन करीत असताना शेलार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात टोलेबाजी केली. त्यांचे विधान भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला इशारा तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSharad Pawarशरद पवारChief Ministerमुख्यमंत्री