शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत नशीब आजमावण्याधी आधी उमेदवारांकडून पाहिला जातोय ‘ मुहूर्त ’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 16:04 IST

सर्व पक्षातील व कोणत्याही जाती धर्मातील उमेदवार आमच्यासाठी एकसारखे असून ज्यांचा अदृष्य शक्तीवर विश्वास आहे,असेच उमेदवार आमच्याकडून मुहूर्ताची माहिती घेत आहेत.

पुणे: पुणेबारामती लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असली तरी अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. परंतु,काही उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी मुहुर्त पाहिला जात असून आत्तापर्यंत पुणे व बारामतीच्या प्रत्येकी दोन उमेदवारांनी पंडित वसंतराव गाडगीळ यांच्याकडून चांगल्या मुहुतार्बाबत विचारणा केली आहे. लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली असून पुणे व बारामती मतदार संघासाठी २८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. नियमावलीप्रमाणे येत्या ४ एप्रिलपर्यंतच उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे काही उमेदवारांच्या विश्वसनीय निकटवर्तियांकडून तर थेट काही उमेदवारांकडूनच गाडगीळ यांच्याकडून चांगल्या मुहूर्ताची माहिती घेतली जात आहे.पंडीत वसंतराव गाडगीळ म्हणाले,पुणे व बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या प्रत्येकी २ उमेदवारांनी माझ्याशी संपर्क साधून चांगल्या मुहूर्ताबाबत विचारणा केली.सर्व पक्षातील व कोणत्याही जाती धर्मातील उमेदवार आमच्यासाठी एकसारखे असून ज्यांचा अदृष्य शक्तीवर विश्वास आहे,असेच उमेदवार आमच्याकडून मुहूर्ताची माहिती घेत आहेत.येत्या ४ एप्रिल रोजी दुपारी अमावस्या सुरू होणार आहे. त्यामुळे अमावस्या सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी 12.15 पर्यंत अर्ज भरावा,असा सल्ला त्यांना दिला आहे. तसेच सर्वसाधारणपणे रोज सकाळी १० दुपारी १२ वाजेपर्यंतचा काळ आदर्श असतो.या काळात अर्ज भरणे उचित होईल,असे उमेदवारांना व कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAstrologyफलज्योतिषPoliceपोलिसBaramatiबारामती