शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Cabinet Reshuffle: नारायण राणेंना संधी; सिंधुदुर्ग पुन्हा केंद्रीय सत्तास्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 19:54 IST

प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यानंतर सिंधुदुर्गातील तिसरे केंद्रीय मंत्री

- महेश सरनाईक  सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप निर्माण करणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांची बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने कोकणात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते, खासदार सुरेश प्रभू यांच्यानंतर नारायण राणे हे सिंधुदुर्गातील तिसरे केंद्रीय मंत्री झाले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विशेषत: कोकणावर आपली राजकीय पकड कायम ठेवण्यात राणे गेली ४० वर्षे यशस्वी ठरले आहेत. त्याचा फायदा साहजिकच कोकणच्या विकासाला झाला आहे. आता राणे केंद्रीय मंत्री झाल्याने त्याचा फायदा कोकण आणि विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेमधून झाली असून १९९९ साली त्यांनी मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. ते दक्षिण कोकणातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याचप्रमाणे युती सरकारमध्ये दुग्धविकास मंत्री, महसूलमंत्री ही पदे त्यांनी भूषविली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदावर सलग सहा वर्षे राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.शिवसेनेला रामराम करून काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर ९ वर्षे ते राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. त्यानंतर २०१४ साली त्यांचा पहिल्यांदा विधानसभेत पराभव झाला होता. त्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. २०१६ मध्ये ते काँग्रेसमधून विधान परिषद सदस्यदेखील झाले होते. मात्र, २०१९ मध्ये राणे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना राज्यसभेवर खासदार केले.नारायण राणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अफाट ताकदीचे, डॅशिंग अष्टपैलू नेतृत्व आहे. राजकारणातून समाजकारण करण्याची वृत्ती कोकणला दाखविणारे नारायण राणे यांचे व्यक्तीमत्त्व अनेकांसमोर आदर्श आहे.तळकोकणातील पहिलेच मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे समितीचे सदस्य म्हणून नारायण राणे यांनी १९९१ ते ९३ या काळात काम पाहिले. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेची सत्ता असताना मार्च १९९५ पासून जानेवारी १९९९ पर्यंत कॅबिनेट मंत्री म्हणून आठ खात्यांचा यशस्वी पदभार स्वीकारला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिले आणि राणे कामाला लागले. त्यांच्या रूपाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला म्हणजेच तळकोकणाला प्रथमच मुख्यमंत्रिपदाचा सन्मान मिळाला होता.अभेद्य राजकीय कारकिर्द४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कणखर विरोधी पक्षनेते अशी भूमिका बजावताना अभेद्य सह्याद्रीएवढीच राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. कोकण सुपुत्राची महाराष्ट्राच्या राजकारणात तळपत राहिलेली तलवार कोकण विकासाचा मानबिंदू ठरली. शिवसेना ते काँग्रेस आणि आता भाजपा अशा राजकीय प्रवासातही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची छाप अखंड राहिली आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस