शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारला

By कुणाल गवाणकर | Updated: February 2, 2021 13:18 IST

अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेचा ठाकरे सरकारला लाभ मिळणार

ठळक मुद्देसीतारामन यांच्या घोषणेचा फायदा होणारकेरळ, राजस्थान सरकारनं केली होती मागणीराज्य सरकारांना घेता येणार अधिकचं कर्ज

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, नोकरदार आणि महिलांसाठी कोणत्याही मोठ्या घोषणा, तरतुदी नसल्यानं काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. मात्र आरोग्य सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे राज्यांना एक मोठा फायदा होणार आहे. सीतारामन यांनी केलेल्या घोषणेमुळे राज्यांना वित्तीय स्वातंत्र्य मिळालं आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी दिली मोजकीच प्रतिक्रिया; म्हणाले...देशातील राज्य सरकारं आता त्यांच्या जीडीपीच्या ४ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून राज्यांना हा अधिकार देण्यात आला आहे. आधी यासाठीची सीमा ३ टक्के इतकी होती. केरळ, राजस्थान यांच्यासारखी भाजपची सत्ता नसलेली राज्यं यासाठी आग्रही होती. अखेर मोदी सरकारनं या राज्यांची मागणी पूर्ण केली आहे. यामुळे सध्याच्या घडीला महसूलाची तूट सहन कराव्या लागणाऱ्या राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं याबद्दलचा निर्णय घेतला आहे."उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पावर 30 मिनिटं बोललं पाहिजे"ठाकरे सरकारला होणार फायदादेशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचं योगदान अतिशय जास्त आहे. मात्र कोरोनामुळे राज्याच्या महसूलावर, जीडीपीवर परिणाम झाला. कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्याला बसला. एका बाजूला उद्योगधंदे बंद असल्यानं महसूल आटला असताना दुसऱ्या बाजूला वैद्यकीय सुविधांवर होणारा खर्च वाढला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला. मात्र आता केंद्रानं राज्यांना वाढीव कर्ज घेण्यास मंजुरी दिल्यानं राज्याला फायदा होईल. ही बाब अर्थमंत्री अजित पवार यांना अर्थसंकल्प सादर करताना फायदेशीर ठरेल.काय म्हणाल्या अर्थमंत्री सीतारामन?१५ व्या वित्तीय आयोगाच्या शिफारशीनुसार आम्ही राज्य सरकारं घेऊ शकत असलेल्या कर्जाची सीमा वाढवत आहोत. आता राज्य सरकारनं त्यांच्या जीडीपीच्या ४ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात, असं सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ही सीमा निश्चित करण्यात आली आहे. या कर्जाचा एक हिस्सा पूल, रस्ते. विमानतळं यासारख्या मोठ्या प्रकल्पांवर खर्च केला जाईल.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे