"योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..." 

By सायली शिर्के | Published: October 6, 2020 11:54 AM2020-10-06T11:54:28+5:302020-10-06T12:09:15+5:30

BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

bsp chief mayawati slams yogi government over Hathras Gangrape | "योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..." 

"योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..." 

Next

नवी दिल्ली - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मायावती यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. "योगी सरकारने चूक सुधारावी व पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठीण होईल" असं म्हटलं आहे. तसेच "हाथरस घटनेतील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारने लक्ष केंद्रीत केलं, तर अधिक योग्य राहील" असं देखील मायावती यांनी म्हटलं.

मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. पुन्हा एकदा योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "हाथरस येथील पीडित कुटुंबाला ज्या प्रकारे चुकीची व अमानुष वागणूक दिली गेली, त्यामुळे देशभरात प्रचंड संताप आहे. सरकारने आता तरी ही चूक सुधारावी व पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठीण होईल" असं मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"उत्तर प्रदेश सरकारने केलेला आरोप खरा की राजकीय खेळी आहे, हे वेळच ठरवेल"

"हाथरस घटनेच्या आड विकासावर परिणाम करण्यासाठी जातीय दंगली भडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा विरोधकांवर उत्तर प्रदेश सरकारने केलेला आरोप खरा की राजकीय खेळी आहे, हे वेळच ठरवेल. मात्र हाथरस घटनेतील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारने लक्ष केंद्रीत केलं तर ते अधिक योग्य होईल" असं देखील मायवती यांनी म्हटलं आहे.

"योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर..."; मायावतींचा सल्ला

योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील असा सल्ला मायावती यांनी याआधी दिला आहे. "हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहितीची घेण्यासाठी तिथे 28 सप्टेंबर रोजी सर्वात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास भाग पाडलं" असं मायावती यांनी म्हटलं आहे.

“त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार हे सर्व अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील" असा सल्ला मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांना दिला आहे. 

"योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा"

"योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा" असं म्हणत मायावती यांनी काही दिवसांपूर्वी टीकास्त्र सोडलं होतं. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मायावती यांनी "केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तसं करू शकत नसाल तर राष्ट्रपती राजवट लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांनी योगींना गोरखनाथ मठात पाठवावे. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं कार्य देण्यात यावं. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" असं म्हटलं होतं. 

Web Title: bsp chief mayawati slams yogi government over Hathras Gangrape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.