शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पद गेले तरी, येडीयुराप्पांना मंत्र्यांच्या सर्व सोयी मिळणार; बोम्मईंनी केली खास व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 15:50 IST

Karnataka Politics: मुख्यमंत्री पद गेले तरी येडीयुराप्पांना त्या सर्व सुविधा मिळणार ज्या एका राज्य कॅबिनेट मंत्र्याला कर्नाटकमध्ये मिळतात. कर्नाटक सरकारने यासाठी एक खास आदेश काढला आहे. 

कर्नाटक (Karnataka) मध्ये बीएस येडीयुराप्पा यांना (Former CM BS Yediyurappa) मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. निजद-काँग्रेसकडून सत्ता खेचून आणत येडीयुराप्पांनी कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यांना दोन वर्षातच सत्ता सोडावी लागली. अंतर्गत विरोध आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरबदल यामुळे त्यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली खरी परंतू त्यांचे जवळचे असलेले बोम्मई यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने सरकारमध्ये त्यांचे वजन पूर्वीसारखेच राहणार आहे. (Yediyurappa will get all facilities and protocols like cabinet minister in Karnataka.)

मुख्यमंत्री पद गेले तरी येडीयुराप्पांना त्या सर्व सुविधा मिळणार ज्या एका राज्य कॅबिनेट मंत्र्याला कर्नाटकमध्ये मिळतात. राज्य कॅबनेट मंत्र्याला मिळणाऱ्या साऱ्या सुविधांबरोबरच त्यांच्यासाठी ज्या प्रोटोकॉलचे पालन केले जाते ते देखील येडीयुराप्पांना देण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने यासाठी एक खास आदेश काढला आहे. 

26 जुलैला बीएस येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कर्नाटकमध्ये भाजपा सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली होती. कर्नाटकच्या लोकांसाठी खूप काम करायचे आहे, असे ते म्हणाले होते. यावेळी त्यांनी मी नेहमी अग्निपरीक्षेतून गेल्याचे सांगितले. 

येडीयुराप्पा यांच्यानंतर त्यांचेच खंदे समर्थक बसवराज बोम्मई यांच्या हाती कर्नाटकची सत्ता देण्यात आली. बोम्मई यांनी मंत्रिमंडळ फेरबदल करत 29 मंत्र्यांना शपथ दिली. त्यांनी आपल्याकडे अर्थ खाते ठेवले आहे. अराग जनेंद्र यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. 

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाBJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण