बॉलिवूड अभिनेत्री नगमा मुंबईतून लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:12 IST2019-01-24T05:05:51+5:302019-01-24T05:12:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

Bollywood actress Nagma to contest from Mumbai? | बॉलिवूड अभिनेत्री नगमा मुंबईतून लढणार?

बॉलिवूड अभिनेत्री नगमा मुंबईतून लढणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केल्याने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून नगमा यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
गुरूदास कामत यांचे निधन आणि प्रिया दत्त यांनी माघार घेतल्याने काँग्रेसमधील समीकरणे बदलली आहेत. प्रिया दत्त यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळूनच निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे. २०१४ मध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील लढतीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी दत्त यांचा पराभव केला होता. आता, दत्त यांनी माघार घेतल्याने नगमा यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.

Web Title: Bollywood actress Nagma to contest from Mumbai?