Narayan Rane: पोलिसांना शिवीगाळ! वरुण सरदेसाई यांच्या विरोधात भाजयुमोची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:49 IST2021-08-25T07:49:39+5:302021-08-25T07:49:59+5:30
Varun Sardesai: वरुण सरदेसाई यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Narayan Rane: पोलिसांना शिवीगाळ! वरुण सरदेसाई यांच्या विरोधात भाजयुमोची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वरुण सरदेसाई यांनी मंगळवारी जुहू येथील आंदोलनादरम्यान मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी भाजयुमोने मुंबईत विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वरुण सरदेसाई यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तेजिंदर सिंह तिवाना यांनी सांगितले की, जर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला तर वरुण सरदेसाई यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
वरुण सरदेसाई यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात यावा. जर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तेजिंदर सिंह यांनी दिला आहे.