शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरियर्स नेमणार - बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 12:01 IST

Chandrashekhar Bawankule : भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असल्याचं बावनकुळे यांचं वक्तव्य. २०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहणार असल्याचा बावनकुळे यांचा विश्वास.

ठळक मुद्देभाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असल्याचं बावनकुळे यांचं वक्तव्य.२०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहणार असल्याचा बावनकुळे यांचा विश्वास.

राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरिअर्स नेमणार असल्याची माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असून २०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाववकुळे यांनी नाशिकमध्ये यावर वक्तव्य केलं.

"भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष आहे. २०२४ च्या निवडणुकीत, केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहिल. राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरिअर्स म्हणून नेमलं जाणार आहे. या अभियानात सर्व समाजाच्या युवकांची नोंदणी केली जाणार आहे," असं बावनकुळे म्हणाले.

ओबीसी समाजासा १९९७ मध्ये २७ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं.  आम्ही हायकोर्टात योग्य मांडणी केल्यानं कोर्टानं आमच्या बाजूनं निकाल दिला. याविरोधात काँग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले. ३१ जुलै २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण टिकवल्याचंही त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा अध्यादेश लॅप्स झाला. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारने बाजू मांडलीच नाही हे दुर्दैव आहे. राज्य सरकारने इम्पिरिअल डेटा तयार करा हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश होते. विधानमंडळाचा गैरवापर करून केंद्रानं हा डेटा द्यावा हा बेकायदेशीर ठराव करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीत कोणीतरी झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचं नाहीये, असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाGovernmentसरकारElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयOBC Reservationओबीसी आरक्षण