महाराष्ट्रात युतीचेच सरकार स्थापन करू इच्छितो - भाजप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 02:51 IST2019-11-01T02:51:02+5:302019-11-01T02:51:18+5:30
याच कारणामुळे आम्ही सतत शिवसेनेच्या संपर्कात आहोत आणि त्यांना विनंती करीत आहोत

महाराष्ट्रात युतीचेच सरकार स्थापन करू इच्छितो - भाजप
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून सुरू असलेल्या तणातणीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आम्ही राज्यात युतीचे सरकार स्थापन करू इच्छितो, डावपेच टाकून नाही, असे म्हटले. याच कारणामुळे आम्ही सतत शिवसेनेच्या संपर्कात आहोत आणि त्यांना विनंती करीत आहोत. एका वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्याने म्हटले की, राजकारणात अंतिम निर्णय घेण्याचीही एक वेळ येते. जर तशी काही परिस्थिती निर्माण होत असेल तर त्यावेळी आम्ही समान विचारांच्या आमदारांशी संपर्क साधून पुढील धोरणावरही विचार करू शकतो.