"सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी वापर"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 05:15 PM2021-01-04T17:15:12+5:302021-01-04T17:17:52+5:30

Amarinder Singh : अमरिंदर सिंग यांनी भाजपाकडून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा ढासळत असल्याची टीका केली आहे.

bjp tarnishing reputation of governors office in greed of power amarinder singh | "सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी वापर"

"सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी वापर"

Next

चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी (Amarinder Singh) यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अमरिंदर सिंग यांनी भाजपाकडून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा ढासळत असल्याची टीका केली आहे. "सत्तेच्या भुकेपायी भाजपा राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार अस्थिर करण्याचा खालच्या दर्जाचा प्रयत्न करण्याचा आरोप देखील भाजपावर करण्यात आला आहे. 

अमरिंदर सिंग यांनी भाजपाकडून लोकशाही संस्थांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं आहे. तसेच भारतीय संविधानाची अक्षरओळख करून घेण्यासाठी भाजपा नेत्यांना त्यांनी आमंत्रण दिलं आहे. "मुख्यमंत्री आणि राज्याचा गृहमंत्री म्हणून माझ्या राज्यात कायदे-व्यवस्था राखण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे भाजप नेत्यांना माहीत नाही का? केंद्रात सत्तेवर असण्यासोबतच लोकशाही संस्थांचं संरक्षक असणाऱ्या पक्षासाठी ही कार्यप्रणाली योग्य नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

"सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. हे बंगालमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे तसेच पंजाबमध्येही त्यांचा हाच प्रयत्न सुरू आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पंजाब भाजपाकडून करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. पंजाब दुसरा पश्चिम बंगाल बनतोय असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मोहाली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. 31 डिसेंबर रोजी रस्ता दाखवणाऱ्या एका नकाशांवर अमरिंदर सिंग यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पोस्टर चिकटवल्याचं दिसून आलं. तसंच यावर अमरिंदर सिंग यांना जीवे मारल्यास 1 दशलक्ष डॉलर्सचं बक्षिसही देण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं. 

सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही शोधण्यास सुरूवात केली आहे. 31 डिसेंबर रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोहालीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी या ठिकाणी खरड-चंडिगड पुलाचं उद्धाटनही केलं होतं. त्याच वेळी पोलिसांना हे पोस्टर चिकटवण्यात आल्याचं दिसून आलं होतं. यापूर्वीही 14 डिसेंबर रोजी काही लोकांनी अमरिंदर सिंग यांच्या पोस्टरला काळं फासलं होतं.

Web Title: bjp tarnishing reputation of governors office in greed of power amarinder singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.