शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 19:59 IST

Jharkhand Election BJP List: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ६६ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

BJP Candidate List: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ६६ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाने हेमंत सोरेन यांची साथ सोडून आलेले माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सरायकेला विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्याचबरोबर बाबूलाल मरांडी यांना धनवार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपाने जामताडा मतदारसंघातून सीता सोरेन, कोडरमा मतदारसंघातून, नीरा यादव, गांडेय मतदारसंघातून मुनिया देवी, सिंदरी मतदारसंघातून तारा देवी, निरसामधून अपर्णा सेनगुप्ता, झरियातून रागिणी सिंह, चाईबासामधून गीता बलमुचू, छतरपूरमधून पुष्णा देवी भुईया यांना उमेदवारी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री बाबूलाल सोरेन यांनाही उमेदवारी

भाजपाने महगामा विधानसभा मतदारसंघातून अशोक कुमार भगत यांना, बरकठ्ठ विधानसभा मतदारसंघातून कुमार यादव, बरही विधानसभा मतदारसंघातून मनोज यादव, बरकागाव विधानसभा मतदारसंघातून  रोशनलाल चौधरी, हजारीबाग विधानसभा मतदारसंघातून प्रदीप प्रसाद, सीमरिया विधानसभा मतदारसंघातून  उज्ज्वल दास, बगोदर विधानसभा मतदारसंघातून  नागेंद्र महतो, जमुआ विधानसभा मतदारसंघातून  मंजू देवी, गिरीडीह विधानसभा मतदारसंघातून निर्भय कुमार शाहबादी, बरमो विधानसभा मतदारसंघातून रवीद्र पांडे, बोकारे विधानसभा मतदारसंघातून  बिरंची नारायण, चंदनकियारी विधानसभा मतदारसंघातून  अमर कुमार बाऊसी, धनबाद विधानसभा मतदारसंघातून राज सिन्हा, झरिया विधानसभा मतदारसंघातून रागिणी सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 

बाघमारा विधानसभा मतदारसंघातून  शत्रुघ्न महतो, बहरागोडा विधानसभा मतदारसंघातून  दिनेशानंद गोस्वामी, घाटशिला विधानसभा मतदारसंघातून  बाबूलाल सोरेन, पोटका विधानसभा मतदारसंघातून मीरा मुंडा, जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून पूर्णिमा दास साहू यांना तिकीट दिले आहे. 

झारखंडमध्ये १३ ऑक्टोबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. झारखंड विधानसभेचा निकाल महाराष्ट्राबरोबरच म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान होणार आहे. 

झारखंडमध्ये ८१ जागांसाठी निवडणूक होत असून, बहुमताचा आकडा ४२ आहे. २०१९ मध्ये ३० जागा जिंकत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाElectionनिवडणूक 2024