शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 22:33 IST

भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे.

ठळक मुद्देनीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावापोलिसांची मदत घेऊन सरकारचा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्नभाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली टीका

शिर्डी: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन, निषेध, निदर्शने केली. याशिवाय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही मोठ्या प्रमाणात झडल्या. यातच भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे. (bjp radhakrishna vikhe patil criticized thackeray govt over narayan rane arrest) 

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डीच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्यातील महाविकासआघाडी सरकार पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला. 

मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार

तर मग आरत्या ओवाळायच्या का?

पोलिसांची मदत घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. असे यापूर्वी कधीही घडले नाही. लोकशाहीत मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, अशी टीका करत इथे लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच ‌करत नाही. असे असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक सवाल विखे पाटील यांनी केला आहे. 

नीलम गोऱ्हेंनी राजीनामा द्यावा

जेव्हा जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? महाडच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार तोंडावर पडलेय, असा टोला लगावत नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा. हे पद घटनात्मक पद आहे. ते कोणत्या पक्षाचे नसते. असे असतानाही त्या राजकीय भूमिका मांडतात, बोलतात. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! रोजगाराला चालना मिळणार; १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी

दरम्यान, नारायण राणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या‌ जिव्हारी लागले. खरे तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर माफी मागावी. देशाचा अमृत महोत्सव की हीरक महोत्सव हे त्यांना समजत नसेल, तर हा देशवासीयांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना