शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिशन बंगालसाठी आता भाजपची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 01:30 IST

सुनील देवधर, तावडेंकडे महत्त्वाची जबाबदारी. भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागाची जबाबदारी असेल.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहारच्या विजयानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन बंगालसाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपने पश्चिम बंगालचे पाच विभाग तयार केले असून प्रत्येकाची जबाबदारी एका नेत्याकडे निश्चित केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत.

भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागाची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी पाहतील. विनोद सोनकर यांच्याकडे बर्दमान तर हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीचा अहवाल तयार करून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय हेच पश्चिम बंगाल राज्याचे प्रभारी असतील. 

गेल्या निवडणुकीत टीएमसीला सर्वाधिक २११ काँग्रेसला ४०, डाव्या पक्षांना २६ तर भाजपला केव‌ळ ३ जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी राज्यात १४८ जागा आवश्यक असतात.

मालवीय सहप्रभारीआयटी सेलचे अमित मालवीय यांना पश्चिम बंगालचे सह प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरकार असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल