तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 04:20 PM2021-08-08T16:20:29+5:302021-08-08T16:21:51+5:30

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील एका जाहिरातीवरून तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

bjp nitesh rane react over tejas thackeray entry in politics | तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे आणखी एक मुद्दा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिला जात आहे, तो म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेश. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील एका जाहिरातीवरून तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. यावर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (bjp nitesh rane react over tejas thackeray entry in politics)

“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”

यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे येणाऱ्या अडचणींबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर नितेश राणे मीडियाशी बोलत होते. यावेळी नितेश राणे यांना तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! कंपन्यांचे तब्बल ८ हजार १०० कोटी परत करणार; करविवाद संपणार?

लहान भाऊ तरी अपेक्षा पूर्ण करेल 

ठाकरे कुटुंबातून कोणी राजकारणात येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. बाळासाहेबांचा आवाज आणि करारीपणा यांनी तरी घ्यावा अशी अपेक्षा आहे. अगोदर थोडा अपेक्षाभंग झाला होता, पण लहान भाऊ तरी पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच तुलना का केली हे त्यांनाच विचारा. भावाला शुभेच्छा दिल्यात की, भावांमध्ये वाद निर्माण केला हेच कळत नाही, असा टोला नितेश राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केल्यासंदर्भात लगावला.

भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा

जबाबदार्‍यामुळे अधिक परिपक्वता येईल

चांगली गोष्ट आहे. दुसरी, तिसरी पिढी येत असेल चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी अनुभव घेतला पाहिजे. शेवटी हा जो काही पक्ष आहे या पक्षांमध्ये परंपरेने जर नेतृत्व येत असेल, तर त्या नेतृत्वाला अशा प्रकारच्या जबाबदार्‍यामुळे अधिक परिपक्वता येईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 

Web Title: bjp nitesh rane react over tejas thackeray entry in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.