शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

'अब तो एक ढुंढो हजार मिलते है...', नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 9:46 AM

bjp mp narayan rane criticizes chief minister uddhav thackeray : बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रं काढतानाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’, असे लिहिले आहे.

ठळक मुद्देनारायण राणे यांच्या दैनिक ‘प्रहार’मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा छापण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावरून भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर नारायण राणेंनीही उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत खोचक टीका केली आहे. नारायण राणेंनी थेट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. (bjp mp narayan rane criticizes chief minister uddhav thackeray)

नारायण राणे यांच्या दैनिक ‘प्रहार’मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा छापण्यात आला आहे. त्यामध्ये नारायण राणेंनी म्हटले आहे. "बाळासाहेब, आपण व्यंगचित्र करण्याचे काम कमी केलेत. या प्रश्नास उत्तर देताना बाळासाहेब खंत व्यक्त करत म्हणत, व्यंगचित्र काढण्यासारखे चेहरे राहिले नाहीत. त्या उंचीचे व्यक्तिमत्त्व नजरेस पडत नाही. दर्जेदार विषय गवसत नाहीत. विकृत आणि विदूषक कमी झाले. आज बाळासाहेब असते तर… उत्सुफूर्तपणे कुंचला उचलला असता अन् दिवसागणिक शेकडो व्यंगचित्रं केली असती… अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर में ही दो दो बसते है’, असे म्हणत नारायण राणेंनी  अशी खोचक टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. 

याचबरोबर, बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रं काढतानाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’, असे लिहिले आहे. फोटोला ‘आज बाळासाहेब असते तर…’ अशी कॅप्शन दिली आहे आणि सर्वात शेवटी ‘खा. नारायण राणे यांच्या संग्रहातून’ असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. नारळ फोडतात आणि पुढे काम होत नाही. पण आपल्या सरकारकडून तसे होणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. तसेच,  ज्या योजना होणाऱ्या असतात त्याचीच आपण घोषणा करतो. त्यामुळे आता या योजनांचा शुभारंभ झाला आहे. त्या आपण पूर्ण करणार आहोत. या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: त्याचं उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी उघडावी, नारायण राणेंचा पलटवारउद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता नारायण राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, अशी खोचक टीका राणे यांनी केली. यासंदर्भात नारायण राणे यांनी टि्विट केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेPoliticsराजकारण