bjp mla Nitesh Rane criticizes Chief Minister uddhav thackeray speech as comedy samrat | विधानसभेत आज एक 'कॉमेडी सम्राट' पाहिला, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर नितेश राणेंची टीका

विधानसभेत आज एक 'कॉमेडी सम्राट' पाहिला, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर नितेश राणेंची टीका

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण विधानसभेतले नसून चौकातलं भाषण होतं, असं वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे.  (bjp mla Nitesh Rane criticizes Chief Minister uddhav thackeray)

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा 'कॉमेडी सम्राटा'चं भाषण असा उल्लेख नितेश राणे यांनी केला आहे. "आज एक 'कॉमेडी सम्राट' विधानसभेत पाहिला आणि ऐकला..महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! "कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री", असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच सुधीर मुनगंटीवर यांनी केलेल्या भाषणाची "नटसम्राट पाहातोय की काय" अशी टीका केली होती. ठाकरेंच्या याच टीकेचा धागा पकडून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण 'कॉमेडी सम्राट' भाषण असल्याचं म्हटलंय. 
 

Web Title: bjp mla Nitesh Rane criticizes Chief Minister uddhav thackeray speech as comedy samrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.