शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? भाजपा आमदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 16:10 IST

BJP MLA Atul Bhatkhalkar : अतुल भातखळकर यांनी बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देअधिवेशनात विविध मुद्द्यांवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत.

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणावरून सभागृहातील राजकीय वातावरण तापले. मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक भूमिका घेत सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. दरम्यान, या अधिवेशनात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar questions to Aditya Thackeray on Bajaj Company impose a fine) 

बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? असा सवाल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.  "२००७ मध्ये बजाज कंपनीला २०० एकर जागा दिली असताना २०२० पर्यंत बजाज कंपनीने यासंदर्भात कुठलंही काम केले नाही. एमआयडीसीने विलंबशुल्क म्हणून १४३ कोटी रुपये त्यांच्याकडे मागितले असतानापर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि १४३ कोटींच्या ऐवजी अवघे २५ कोटी घ्यायचे हा निर्णय झाला का?", असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

अखेर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून उचलबांगडी होणारमनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवले जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वाझेंना पाठिशी घालण्याचे कारण काय, असा सवाल भाजपाकडून उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी महाविकार आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले. वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरAaditya Thackerayआदित्य ठाकरेVidhan Bhavanविधान भवन