शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

वादळ, पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने भरपाई द्या, भाजपा आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 21:38 IST

atul bhatkhalkar : साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून  महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले, असे अतुल भातखळकर म्हणाले. 

ठळक मुद्देसोसायट्यांच्या भिंतींवर पडलेली झाडे अजून हटविली गेली नाहीत. झाडे पडून २ मृत्यू झाले आहेत. याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.

मुंबई : नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळामुळे मुंबई महानगरातील झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून महापालिका व राज्य सरकारने संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी तसेच मुंबईत लसीकरणात चालू असलेले गैरप्रकार थांबवावेत अशा मागण्या भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केल्या. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (BJP MLA Atul Bhatkhalkar demands immediate compensation to those affected by storms and rains)

मुंबईत वादळाने अनेक ठिकाणी झोपड्यांचे पत्रे उडून गेले आहेत. वादळाने, पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी. या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून  महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले, असे अतुल भातखळकर म्हणाले. 

(शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना)

याचबरोबर, छोट्या , मोठ्या रस्त्यांवर झाडे मोठ्या प्रमाणावर पडली . वर्दळीच्या मोठ्या रस्त्यांवरील झाडे महापालिकेकडून हटविली गेली.  मात्र छोट्या रस्त्यांवर पडलेली , सोसायट्यांच्या भिंतींवर पडलेली झाडे अजून हटविली गेली नाहीत. झाडे पडून २ मृत्यू झाले आहेत. याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला. तसेच, महापालिकेच्या झाडं कापणीच्या कंत्राटाची मुदत मार्चमध्येच  संपली आहे . हे कंत्राट महापालिकेत ज्यांनी अडवून ठेवले त्यांची चौकशी करा व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली.  

("मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत")

'आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने कोरोना लसीकरणात गैरप्रकार'मुंबई महापालिकेकडून चालू असलेल्या लसीकरणात प्रचंड गोंधळ चालू आहे.   १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले असताना कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे व अभिनेत्यांशी संबंधित व्यक्तींचे बिनबोभाट लसीकरण चालू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालू आहेत. लसीकरणातील गैरप्रकार न थांबल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशाराही अतुल भातखळकर यांनी दिला.         

टॅग्स :cycloneचक्रीवादळTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर