शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

"हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार! शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा...’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 13:27 IST

Sharjil Usmani : शरजिल उस्मानी (Sharjil Usmani) हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.

मुंबई - एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी या वक्त्याने हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले होते. तसेच उस्मानी याच्यावर कारवाईसाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, शरजिल उस्मानी (Sharjil Usmani) हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले, असा टोला भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी लगावला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government on Issue of Sharjil Usmani )

शरजिल उस्मानीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करताना केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. 

दरम्यान,  एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल पुण्यात नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, याठी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी (२३) याने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एल्गार परिषदेतील भाषण आक्षेपार्ह नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. आपल्यावर नोंदविलेला गुन्हा तथ्यहीन आहे. आपल्या भाषणातील काही विधाने संदर्भ न देता उचलण्यात आली आहेत. भाषणात मी सद्यस्थितीतील समाजरचना आणि समस्या याबाबत बोललो आहे आणि या समस्येवर उपायही सांगितला आहे. केवळ लोकांना समस्या समजावी, यासाठी काही कठोर शब्द वापरले, असेही  उस्मानीने याचिकेत नमूद केले होते.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे