शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार?; फडणवीसांच्या 'त्या' विधानानं चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:41 IST

महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत, तरीही अध्यक्ष निवडीची उत्सुकता

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडे भक्कम बहुमत असल्याने नाना पटोले यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडताना कुठलीही अडचण येणार नाही असे चित्र असले तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे या निवडणुकीत काही वेगळे होईल का, याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले होते. तेव्हा या सरकारने १६९ मते घेत विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते. पटोले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. पटोेले यांच्या जागी आता नवे अध्यक्ष निवडताना हे पद काँग्रेसकडे जाणार हे निश्चित मानले जाते. पटोले यांनी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ असताना राजीनामा द्यायला नको होता, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले होते.‘आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान एका कार्यक्रमात फडणवीस यांनी केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन कमळ’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत. शहा यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार पडावे, असे विधान राणे यांनी शनिवारी केले. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबुतीने एकत्र आहेत आणि अध्यक्षपदाची निवडणूक अगदी सोपी असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत म्हणाले की, फासे सगळ्यांनाच टाकता येतात. फडणवीस यांनी वर्षभर बरेच फासे टाकून पाहिले पण सरकार स्थिर आहे. त्यांचे फासे गुळगुळीत झाले आहेत.शिवसेनेच्या मुखपत्रात मात्र काँग्रेसला पाच वर्षांसाठी अध्यक्षपद दिलेले होते, एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचा अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, असे म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे यावर तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, या शरद पवार यांच्या वक्तव्याची आठवणही मुखपत्रात करून देण्यात आली आहे.विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - कदमसांगली : महाविकास आघाडीची स्थापना झाली, त्यावेळच्या चर्चेनुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढेही ते काँग्रेसकडेच राहील, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यावेळी कोणते पद कोणाकडे राहणार, याची सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळच्या तडजोडीनुसार हे पद काँग्रेसला मिळाले. त्यामुळे आता यावर पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. हे पद काँग्रेसकडेच राहील. याबाबत आणखी कोणत्या घटक पक्षाचे काही वेगळे मत असेल तर त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार दिला आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने विधानसभा अध्यक्षपदाबाबत आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.भाजपचा देशात हुकूमशाही कारभारकेंद्र सरकारच्या धोरणांबद्दल कदम म्हणाले, भाजपने संपूर्ण देशात हुकूमशाही कारभार सुरू केला आहे. कोणाचेही म्हणणे ऐकून घेण्यास ते तयार नाहीत. त्यांनी गोरगरीब जनता, शेतकरी व अन्य घटकांचा विचार केला नाही तर येणारा काळ त्यांना माफ करणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAmit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले