"...म्हणून इच्छा नसतानाही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा केला स्वीकार"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 02:05 PM2020-12-28T14:05:25+5:302020-12-28T14:08:32+5:30

Sushil Kumar Modi And Nitish Kumar : नितीश कुमार यांनी इच्छा नसतानाही मुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? यामागचं नेमकं कारण आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी सांगितलं आहे.

bjp leader sushil kumar modi supports nitish kumar about his statement on cm face | "...म्हणून इच्छा नसतानाही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा केला स्वीकार"

"...म्हणून इच्छा नसतानाही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा केला स्वीकार"

Next

नवी दिल्ली - बिहारच्या राजकारणात खळबळ माजली असून नितीश  कुमार आता नेमकं काय करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मला मुख्यमंत्रिपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. पक्षाची धुरा सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केलं. 'मी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं यासाठी बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मला खुर्चीचा मोह नाही,' असं नितीश कुमार म्हणाले.

नितीश कुमार यांनी इच्छा नसतानाही मुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? यामागचं नेमकं कारण आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी सांगितलं आहे. "नितीश कुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. भाजपा आणि जदयूच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्या नावावर व दूरदृष्टीवर निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांच्यासाठी मतदान केलं आहे. जदयू, भाजपा व विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा स्वीकार केला" असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं आहे.

"जदयूच्या नेत्यांनी सांगितलं आहे की, अरुणचाल प्रदेशमध्ये जे काही झाले, त्याचा परिणाम बिहार सरकार व बिहारमधील आघाडीवर होणार नाही. भाजपा-जदयू आघाडी अतूट आहे. नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पाच वर्षे काम करेल" असं देखील सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यांचं मत स्पष्ट केलं. 'भाजपला मुख्यमंत्रिपद हवं असल्याचं लोक म्हणतात. मला त्याची कोणतीही चिंता नाही. मी खुर्चीला, पदाला चिकटून राहणारा नेता नाही. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मी एनडीएकडे माझी इच्छा बोलून दाखवली. पण माझ्यावर इतका दबाव होता की मला पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारून काम सुरू करावं लागलं,' असं नितीश यांनी सांगितलं.

पक्षाची धुरा रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली असून कुमार आता नेमकं काय करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मला मुख्यमंत्रिपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी अध्यक्षपदासाठी रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तो मंजूरदेखील झाला. त्यामुळे आता रामचंद्र प्रसाद सिंह संयुक्त जनता दलाचं नेतृत्त्व करतील.


 

Web Title: bjp leader sushil kumar modi supports nitish kumar about his statement on cm face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.