शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

"राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 14:07 IST

भाजपा नेते राम कदम यांचा सवाल

ठळक मुद्देयापूर्वी काँग्रेसनं संभाजीनगर नामांतर करण्याला केला होता विरोधनामांतराची तारीख सांगा, राम कदम यांची विचारणा

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिंमडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत धाराशिव- उस्मानाबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये धाराशिव असा उल्लेख करण्यात आल्यानंतर भाजपा नेते आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारत निशाणा साधला आहे. "राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार? सत्ता तुमची आहे, कोणी अडवलं तुम्हाला? की निवडणुका जवळ आल्या की  फक्त नौटंकी? ज्यानी राममंदिराच्या भूमिपूजनावर प्रश्न उपस्थित केले न्यायालयात निर्णय प्रलंबित केला त्यांच्यासोबत सत्ता?," असे सवाल राम कदम यांनी केले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. तसंच हे का तुमचं हिंदुत्व असा प्रश्नही त्यांनी केला आहे. राम कदम चर्चेतपवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचं म्हटलं जात आहे. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. खैरमोडे यांना भाजपच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या तिघांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिपही समोर आली होती. दरम्यान, यानंतर अद्यापही त्या ऑडियो क्लिपमध्ये आपला आवाज आहे का नाही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. 

टॅग्स :BJPभाजपाRam Kadamराम कदमMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे