आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानं आपण काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. दरम्यान, शुक्रवारी नाना पटोले यांनी जुहू येथील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यारून भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. " नानांच्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन," असं म्हणत लाड यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला."नानांच्या नाना तऱ्हा!! सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा. स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लाऊन अटक करायचं. नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय. महाआघाडी हेच का अजब तुझे सरकार..," असं म्हणत प्रसाद लाड यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पटोले यांच्यावर बोचरी टीका केली.
सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 09:51 IST
Prasad Lad On Nana Patole : नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, असं म्हणत लाड यांनी साधला निशाणा
सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका
ठळक मुद्देनानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, लाड यांनी साधला निषाणानानांच्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, लाड यांचं वक्तव्य