शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय सिंह म्हणाले - गोडसे देशातील पहिला दहशतवादी; भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 16:40 IST

नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

भोपाळ : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांवर (Digvijaya Singh) निशाणा साधला आहे. नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. काँग्रेस आणि त्यांचे नेते नेहमीच देशभक्तांना शिव्या देतात, असे प्रज्ञा सिंहांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर 'भगवा आतंकवाद' सारखा शब्दही काँग्रेसनेच आणला, आता यावरूनच त्यांचे विचार काय असतील, हे समजते, असेही प्रज्ञा सिंह म्हणाल्या.

काँग्रेसने केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकले आहे -प्रज्ञा सिंह ठाकून या भोपाळमधून भाजपच्या खासदार आहेत. दिग्विजय सिंह यांच्या नाथूराम गोडसेसंदर्भातील वक्तव्यासंदर्भात त्यांना विचारले असता, आपल्या अंदाजातच त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या, ‘काँग्रेसने केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकले आहे.  त्यांच्या नेत्यांनी ‘भगवा आतंकवाद’ सारख्या शब्दांचा वापर केला आहे. याहून अधिकि शरमेची गोष्ट काय असू शकते.’ 

प्रज्ञा सिंह म्हणाल्या होत्या नथुराम देशभक्त -तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. यावरून प्रज्ञा सिंह या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या होत्या. याच मुद्द्यावर देशाचे राजकारणही तापले होते. यानंतर भाजपला स्पष्टिकरणही द्यावे लागले होते. मात्र, असे असतानाही प्रज्ञा सिंह या भोपाळमधून मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या.

प्रशासनाने बंद केली गोडसे ज्ञानशाळा - ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतल्यानंतर हिंदू महासभेने नाथूराम गोडसेंची ज्ञानशाळा मंगळवारी बंद केली. 10 जानेवारीला हिंदू महासभेने दौलतगंज येथील आपल्या कार्यालयात ही ज्ञानशाळा सुरू केली होती. तसेच यावेळी गोडसेची पुजाही करण्यात आली होती. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच शिवराज सरकारलाही घेरले जात होते. यानंतर प्रशासनाने महासभेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ही ज्ञानशाळा बंद करण्यात आली. तसेच संबंधित भागात कलम 144 लावण्यात आले.

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेBJPभाजपाDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश