सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. तर दुसरीकडे आरोग्यसुविधांवरही मोठा ताण येत आहे. अशा परिस्थितीत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर निशाणा साधण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असताता असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना उत्तरही दिलं होतं. दरम्यान, आता यामध्ये भाजपचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी उडी घेत उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. "अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पाहा. ते तुमच्याकडे नाही, तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी आमदार सोडा नारळ पाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात विचार करून बोललं पाहिजे," असं म्हणत निलेश राणे यांनी अजित पवारांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांवर निशाणा साधला.
अजित पवार साहेब, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल ना, त्या दिवशी...; राणेपुत्राचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 15:36 IST
भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं.
अजित पवार साहेब, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल ना, त्या दिवशी...; राणेपुत्राचा टोला
ठळक मुद्देभाजपचे नेते तुमच्याकडे नाही उपमुख्यमंत्र्यांकडे येतात, राणे यांचं वक्तव्यभाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं.