शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही 'वाझे' हवेत का?, भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 5:40 PM

MPSC : लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे, अशी शंका येऊ लागली आहे, अशी टीका माधव भांडारी यांनी केली आहे.

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या 4 रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजित पवार यांनी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. (BJP Leader Madhav Bhandari criticizes Mahavikas Aghadi government on MPSC vacancy)

राज्य लोकसेला आयोगाचे एकूण 6 सदस्य असतात. या पैकी 4 सदस्यांच्या जागा अनेक महिन्यांपासून भरल्याच गेल्या नाहीत. आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. ही मुदत संपल्यावर अजितदादांनी या जागा भरण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख जाहीर केली आहे. लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे, अशी शंका येऊ लागली आहे, अशी टीका माधव भांडारी यांनी केली आहे.

याचबरोबर, आयोग सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या न गेल्याने लोकसेवा आयोगाला पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. परीक्षा घेणे, निकाल लावणे, पदांची भरती करणे अशी आयोगाची अनेक कामे वेळेत पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात. या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शेकडो होतकरू युवक परीक्षा होण्याची आणि परीक्षांचा निकाल लागण्याची वाट बघत राहतात. लोकसेवा आयोगाच्या दिरंगाईमुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आयोग सदस्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्या, अशी मागणीही माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे नैराश्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या मुलाने गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपासह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त सदस्यांच्या जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, 31 जुलै येऊन गेल्यानंतरही अद्याप जागा न भरल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच, यावरून भाजपानेही टीका केली आहे.

रोहित पवारांचा राज्यपालांना टोलाएमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवरुन विचारलेल्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. राज्य शासनाने एमपीएससी सदस्यांची यादी पाठवली आहे. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्याने ट्विट करुन, 31 जुलैपूर्वी आपण एमपीएससी आयोगातील रिक्त जागा भरणार होता, त्याचे काय झाले?, असा सवाल विचारला. 

दरम्यान, ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी 12 आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाही आहे. यावरून रोहित पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :BJPभाजपाMPSC examएमपीएससी परीक्षाRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवार