गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून, रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यांमधील एका याचिकेवर सुनावणी करताना राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याची सूचना न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. यानंतर भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे."राज्य सरकारवर न्यायालयानं सणसणीत ताशेरे ओढलेत. पण कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावाने कांगावा करणार, अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ देणार. राज्य सरकार या ताशेऱ्यातून काही धडा घेणार का? मुख्यमंत्री घराबाहेर पडणार का?," असं म्हणत उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली.
"कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावानं कांगावा करणार...."; भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:04 IST
राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना
कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावानं कांगावा करणार....; भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा
ठळक मुद्देराज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनाजनहित याचिकेवर न्यायालयात पार पडली सुनावणी