शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?'; पडळकर यांचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 11:12 IST

Gopichand Padalkar Criticizes Sanjay Raut : पडळकर यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका. हुजुरेगिरीला बावाचळेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत?, पडळकर यांचा सवाल.

ठळक मुद्देपडळकर यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका.हुजुरेगिरीला बावाचळेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत?, पडळकर यांचा सवाल.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "आपल्या हुजुरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत? असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय?," असा सवालही पडळकर यांनी केला. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांवर टीकेचा बाण सोडला.

"असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय? जो फुटला तर तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. नारायण राणे यांच्यावरील सूडाची कारवाई ही कायद्याची कारवाई असं तुम्ही संबोधता. पण पोलिसांना आयाबहिणींवरून शिव्या देणाऱ्या वरूण देसाई यांना अटक का नाही केली? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?," असा सवालही पडळकरांनी केला. "ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचं मार्मिक शब्दांनी पितळ उघडं केलं, पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करताय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय. हिंदू समाजाला सडलेला समाज म्हणणारा सर्जिल उस्मान उजळ माथ्यानं माहाराष्ट्रात फिरतो. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्याच्यावर कारवाई करताना तुमचे हात थरथर कापतायत," असा आरोपही त्यांनी केला.

"सामनाचं 'बाबरनामा'त रुपांतर"मला बाळासाहेबांच्या दैनिक सामनाचं दैनिक बाबरनामात रूपांतर करणाऱ्यांना हेच विचारायचंय की त्यावेळी तुमची अस्मिता कोणाच्या पायापुढे लोटांगण घालते. कोणापुढे तुम्ही नतमस्तक होता. संजय राऊत कंबरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला, अन्यथा तुमच्या हम करे सो कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील अशी टीकाही पडळकर यांनी केली.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Barveसंजय बर्वेSharad Pawarशरद पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे