शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:49 IST

Anurag Thakur in Rajya Sabha : मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल, अनुराग ठाकुर यांचा विश्वास

ठळक मुद्देमोदी सरकार हे देशआला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल, अनुराग ठाकुर यांचा विश्वासमोदी सरकारच्या काळात कोणताही घोटाळा नाही, याला प्रमाणिक सरकार म्हणतात : अनुराग ठाकुर

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी शुक्रवारी राज्य सभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एअर इंडियाची परिस्थिती कोणामुळे खालावली आणि देशातील ६ विमानतळांच्या खासगीकरणाची सुरूवात कोणी केली होती? असा सवाल ठाकुर यांनी सार्वजनिक संपत्ती विकण्याच्या आरोपावरून केले. यावेळी अनुराग ठाकुर यांनी युपीए सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा मुद्दादेखील उपस्थित केला. "डॉक्टरसाहेब (माजी पंतप्रधान मनमोहन सिंग) प्रामाणिकच व्यक्ती होते. परंतु त्यांच्या खाली काम करत असलेल्यानी कदाचितच असा कोणता विभाग सोडला ज्यात घोटाळा झआला नाही. आज सात वर्षांच्या मोदी सरकारच्या कालावधीत सात पैशांचाही घोटाळा झाला नाही. हे प्रामाणिक सरकार असतं," असं ठाकुर म्हणाले. "आज व्याजदर कमी होत आहेत अनेक सुविधा मिळत आहेत. यामुळे सामान्य व्यक्तींना गरीबांना घरं मिळत आहेत. मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल," असा विश्वासही ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला. आज स्मार्टफोन्सचा सर्वात मोठा उत्पादक गेश म्हणून भारत पुढे आला आहे. देशात सात मोठे टेक्सटाईल पार्क उभारले जाणार आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी देशातील अनेक तज्ज्ञांशी चर्चा आणि सल्ले घेण्यात आले. यापूर्वी देशात पीपीई किट तयार होत नव्हते. परंतु आज ते आपण अन्य देशांना देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी अनुराग ठाकुर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी सरकारच्या काही धोरणांमुळे बंगालच्या लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेता आला नाही. ज्यांची नजरच काळी आहे त्यांना सर्वच काळं दिसत असल्याचं म्हणत ठाकुर यांनी नव्या कृषी कायद्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल