शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचं गॅझेट घालून अदृश्य झाले, बहुदा ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:10 IST

भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला. यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनीही केली होती टीका

ठळक मुद्देयापूर्वी प्रकाश आंबेडकरांनीही केली होती टीका.खरे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता सवाल.

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यातील आरोग्य यंत्रणांवरही ताण आहे. याशिवाय आवश्यक औषधांचाही तुटवडा असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीतवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. "मुखमंत्री उद्धव ठाकरे कुठंही दिसत नाहीत. सर्व निर्णय अजित पवारचं जाहीर करत असतात. सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे."मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसत आहे," असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.  

काय म्हणाले होते आंबेडकर ?"१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. सरकारनं खरं तर मोफत लस देणं गरजेचं आहे. त्या दराबाबत "लसीच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत" असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता. "लसीबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसीचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी? सगळ्यांना १५० रुपयात लस द्यावी," असेही यावेळी म्हणाले. कोरोनामुळे मी आठवड्याची मुदत देतो अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.मुखमंत्री उद्धव ठाकरे कुठंही दिसत नाहीत. सर्व निर्णय अजित पवारच जाहीर करत असतात. सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAjit Pawarअजित पवार