शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

"संजय राऊत, अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही, असल्यास तो केवळ टक्केवारीशी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 15:29 IST

सामना संपादकीयतील राम मंदिरावरील मुद्द्यावरुन भाजप नेत्याचा राऊतांना टोला

ठळक मुद्देराममंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, असं म्हणत सामनातून करण्यात आली होती टीकाकाँग्रेसमुळे वाण नाही पण गुण लागला, भाजप नेत्याचा टोला

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. वाढत्या दरवाढीवरून शिवसेनेनं मोदी सरकारसह भाजपवरही टीकेचे बाण सोडले आहेत.  राममंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील, असं म्हणत सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेनं केंद्रावर निशाणा साधला होता. यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला टोला लगावला आहे."संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असलाच तर तो टक्केवारीशी आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून राम मंदिराचा चंदा आठवला. काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण मात्र लागलाय. पेट्रोल-डिझेलच्या दरात २६ रूपयांचा वॅट राज्य सरकारचा आहे. तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका. मग त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करा," असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला. मोदी जो कर जमा करतायत त्याचा ४१ टक्के तुम्हाला मिळतोय. त्यामुळे लोकांना विनाकारण भडकवायचं आणि खोटं बोलायचं हे उद्योग आता संजय राऊत यांनी बंद करावेत, असंही ते म्हणाले.काय म्हटलंय अग्रलेखात?लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा. राममंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरRam Mandirराम मंदिरPetrolपेट्रोलDieselडिझेल