"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही," अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली होती. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धारही भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या प्रभू श्रीरामावरील वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही ही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही. हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते," असं म्हणत भातखळकर यांनी टिकैत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टिकैत यांच्यावर टीका केली.
... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 15:22 IST
Rakesh Tikait : भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली होती.
... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका
ठळक मुद्देभाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली होती. शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना मतं न देण्याचं टिकैत यांचं आवाहन