शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

"महाराष्ट्राची मान अपमानाने, शरमेने झुकतेय; तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, कुठे गेली तुमची अस्मिता?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 14:23 IST

BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray : भाजपाने (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई - पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. याच दरम्यान भाजपाने (BJP) यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी "महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे; तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, कुठे गेली तुमची अस्मिता?" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहणार? असा सवाल देखील भाजपाने विचारला आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. 

"राज्यकर्त्यांनो, पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे. दिवसागणिक पोलिसांवर हल्ले होत आहेत, भर दिवसा पोलिसांचे मुडदे पाडले जात आहेत, महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे, आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसला आहात. कुठे गेली तुमची अस्मिता? संगमनेरमध्ये गर्दी करू नका सांगणाऱ्या पोलिसावर जमावाने काल हल्ला केला. पण अजूनही पोलिसांचा अपमान झाल्याचा साक्षात्कार संजय राऊत यांना कसा झाला नाही? हल्लेखोर कोण पाहून टोपी फिरवली की काय?" असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

"पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत या बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर केलेल्या घोषणा एवढ्यातच कसे विसरलात? धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहात बसणार. महसूलमंत्र्यांच्या संगमनेर शहरात या राज्यात नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का? संगमनेरमध्ये पोलिसांनी अजूनही कठोर कारवाई केली नाही. नवाब मलिक तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का?" अशा शब्दांत भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

"संगमनेरातील गुन्हेगारांवर कारवाईच्या नावाखाली पांघरूण घालण्याचे षडयंत्र रचले जाणार असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल. संगमनेरमध्ये कोरोना नियमांचे धडधडीत उल्लंघन झाले तरी कारवाई कोठे? नाना पटोले तुम्ही बाळासाहेब थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात काय? दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस हवालदाराचा निर्घृण खून केला. पोलीस दल हादरले, पण गृहखाते ढिम्म आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका तडीपार गुंडाने पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढविला. पोलिसांचे मनोबल खच्ची करणाऱ्या अशा गुंडगिरीला जबाबदार कोण? तीन दिवसांपूर्वी नागपूरजवळ टोली येथे अवैध दारूधंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने जीवघेणा हल्ला केला. तुफान दगडफेक करून दहशत माजविली" असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊत