BJP Gopichand Padalkar warning on Ajit Pawar decision on Reservation in Promotions | “...नाहीतर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही”; अजित पवारांच्या ‘त्या’ निर्णयावर गोपीचंद पडळकरांचा इशारा

“...नाहीतर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही”; अजित पवारांच्या ‘त्या’ निर्णयावर गोपीचंद पडळकरांचा इशारा

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागलं आहेएसी, एसटी, ओबीसी समाजाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम सरकारकडून केलं जातंयएकाच बैठकीनंतर थेट निर्णय घेतल्याने त्याचा फटका दीड लाख कर्मचाऱ्यांना बसला आहे

मुंबई – मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLC Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला मागासवर्गीयांवर अन्याय करायचा आहे, मंत्रिगटाची एक बैठक होते आणि दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला जातो, हे सगळं ठरवून केलं जातंय, अजित पवारांनी(DCM Ajit Pawar) या बैठकीत काय केले ते राज्याला सांगाव असं पडळकरांनी म्हटलं आहे.(BJP MLC Gopichand Padalkar Warning to Thackeray Government over Reservation in Government Promotion)

याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, मागासवर्गीय पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं आहे, १८ फेब्रुवारीला शासनाने आदेश काढला, आरक्षणाचा कोणताही विचार न करता १०० टक्के जागा भरल्या जातील असं सांगितले, मग आरक्षित ३३ टक्के जागांवर घाला घालण्याचं काम या सरकारकडून केलं जातंय, मंत्रिगट समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत, त्यांनी ओबीसींसाठी काय केले हे सांगावं, एकाच बैठकीनंतर थेट निर्णय घेतल्याने त्याचा फटका दीड लाख कर्मचाऱ्यांना बसला आहे असा आरोप त्यांनी केला, टीव्ही ९ शी ते बोलत होते.

इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकार  मागासवर्गीय लोकांनी अन्याय करतंय, महापुरूषांच्या नावानं राजकारण करायचं आणि वंचित घटकांना लाभापासून दूर ठेवायचं हे सरकारचं धोरण आहे. संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार मागासवर्गीयांना पदोन्नती दिली जात नाही, १६ तारखेला बैठक होते आणि १८ तारखेला निर्णय होतो, एका बैठकीत काय केले हे अजित पवारांनी सांगावं असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागलं आहे, राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा फटका मागासवर्गीयांना बसला आहे, एसी, एसटी, ओबीसी समाजाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम सरकारकडून केलं जातंय, त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा या सरकारमधील एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही असा गंभीर इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे.

Web Title: BJP Gopichand Padalkar warning on Ajit Pawar decision on Reservation in Promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.