bjp gives ultimatum to thackeray government over increase electricity bills | ...तर मंत्रालयात घुसू; वाढीव विज बिलांवरून भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

...तर मंत्रालयात घुसू; वाढीव विज बिलांवरून भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई: आपल्या गलथान कारभारामुळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले अदा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत बीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा अल्टिमेटम भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाच्या वेळी बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षात बेबनाव असल्याचा आरोप केला. राज्याच्या उर्जा मंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन दिले. परंतु उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांत सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करत आहे. पण जोपर्यंत राज्यातील जनतेला 300 युनिटपर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या काळात भरमसाठ व अंदाजे वीज बील अदा करणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता 'शॉक' दिल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील आमदार भातखळकर म्हणाले.
 

Web Title: bjp gives ultimatum to thackeray government over increase electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.