शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Video: “संजय राऊतजी, आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे ते सांगा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 10:28 IST

तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिला.

ठळक मुद्देतुमच्या बंधूंनाही मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा आहे. मग तुम्हालाही काँग्रेस राष्ट्रवादीचे आभार मानायची संधी मिळेल.आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खूप जास्त आहे. ती यापुढेही वाढत जाईल. म्हणून शिवसेनेला ते झेपलं नाही

मुंबई –  नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट विस्तारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला होता. धर्मेंद्र प्रधान हे देशाला नवे शिक्षणमंत्री मिळाले. आधी ते पेट्रोलियम मंत्री होते, मी त्यांना ओळखतो. कालपर्यंत ते रॉकेल, पेट्रोल विकत होते. याआधी रमेश पोखरियाल होते. ते शाळेतच गेले नव्हते पण ते देशाचे शिक्षणमंत्री होते. त्याच्याआधी स्मृती इराणी होत्या त्या मॉडेलिंग करायच्या. म्हणजेच शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण घडवतात अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलं होतं. यावर भाजपाने संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, तुमच्या बंधूंनाही मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा आहे. मग तुम्हालाही काँग्रेस राष्ट्रवादीचे आभार मानायची संधी मिळेल. तुम्ही केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल जे काही बरळलात, त्याआधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामना संपादकपदाचा काय संबंध आहे ते सांगा. मग मी स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा काय संबंध याचा खुलासा करेन. तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा त्यांनी दिला.

तसेच संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) कधी नव्हे ते खरं बोलले. नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खूप जास्त आहे. ती यापुढेही वाढत जाईल. म्हणून शिवसेनेला ते झेपलं नाही असा टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला आहे. नारायण राणेंची उंची मोठी आहे पण त्यांना दिलेलं खातं शोभत नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरून भाजपाने शिवसेनेवर पलटवार केला आहे.

सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर साधला निशाणा

नारायण राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल, असं सामनात म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्या डॉ. भारती पवार व नेते कपिल पाटील हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे. भाजपाचे नेते डॉ. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेलं. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय? असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून विचारला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपा