शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Result : अमित शहांचा नितीश कुमारांना फोन; दिल्लीचे दूत मुख्यमंत्री निवासस्थानी हजर

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 20:00 IST

Bihar Election Result 2020 : जदयू-भाजपा आणि राजद-काँग्रेसच्या गोटात आताही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 10 ते 12 जागांवर 500 ते 100 मतांचे अंतर आहे.

पटना : बिहार निवडणुकीची मतमोजणी ऐन रंगात आलेली असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थेट दिल्लीतून गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केला आहे. याचवेळी भाजपाचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि अमित शहांचे दूत नितीश कुमारांच्या निवासस्थानी पोहोचले असून गुप्त खलबते सुरु झाली आहेत. 

जदयू-भाजपा आणि राजद-काँग्रेसच्या गोटात आताही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 10 ते 12 जागांवर 500 ते 100 मतांचे अंतर आहे. तर काही जागांवर एकेरी आकड्याचे मताधिक्य आहे. बिहारमध्ये अद्याप सव्वा कोटी मते मोजायची असून एडीएने मिळविलेली आघाडी कमी जास्त होण्याची आशा दोन्ही बाजुच्या नेत्यांना आहे. यामुळे पुढे काय करायचे याबाबतची रणनीती ठरविली जात आहे. 

अमित शहांनी फोन केला तेव्हा भाजपाचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश अध्यक्ष संजय जयस्वाल, केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्यासह उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी मुख्यमंत्री निवासस्थानी आले होते. या नेत्यांमध्ये निवडणूक निकाल काय येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते. जदयूच्या वरिष्ठ नेत्यांपैकी दोघांनी अमित शहांनी फोन केल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. परंतू त्यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्यास नकार दिला. निवडणूक निकाल आणि सध्याचे ट्रेंड यावर चर्चा झाल्याचे या नेत्यांनी सांगितले. 

निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.

राजदचा भाजपाला धोबीपछाडदरम्यान, राजदने भाजपाचा सर्वात मोठ्या पक्षाचा खिताब काही काळासाठी का होईन काढून घेतला आहे. आजतकने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 123 तर राजद महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा 72, राजद 74, जदयू 43, काँग्रेस 20, सीपीआयएल 12 आणि इतर जागांवर अन्य पक्ष आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक