शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Bihar Assembly Election Result : टफ फाईट! बिहारमध्ये 45 जागांवर 100 पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर; चुरस वाढली

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 12:50 IST

Bihar Election Result 2020: नितिशकुमार गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. 

पटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजनी (Bihar election result) आता अत्यंत रोमांचक स्थितीत येऊन पोहोचले आहे. नितिशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणत निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे. 243 जागांपैकी 7 जागांवर भाजपा, राजद 61, जेडीयू 52, काँग्रेस 22 आणि भाकपा-माले 13, व्हीआयपी सहा, एलजेपी 4 जागांवर आणि माकपा तीन जागांवर पुढे आहेत. अन्य पक्ष, अपक्षांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे जवळपास 47 जागांवर दोन उमेदवारांमध्ये 100 पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर आहे. 

नितिशकुमार गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती. 

लालू प्रसाद यांचे पूत्र तेजप्रताप हे देखील हसनपुर विधानसभा मतदारसंघातून केवळ 2500 मतांनी पुढे असून जेडीयू उमेदवाराकडून त्यांना कडवी झुंज मिळत आहे. महत्वाचे म्हणजे तिसऱ्या राऊंडपर्यंत तेजप्रताप मागे होते. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या विजयासाठी प्रचारसभांचा धडाका लावला होता.तर नितिशकुमार यांचे सहा मंत्री पिछाडीवर आहेत. हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-सेक्युलर (हम) चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हे इमामगंज मतदारसंघातून 2000 मतांनी पिछाडीवर आहेत. 

भाजपाची ताकद वाढलीमागील निवडणुकीत एनडीएला १२५, राजद ८०, काँग्रेस २६, सीपीआय ३, एचएएम १, एमआयएम १, अपक्ष ५ असं संख्याबळ आहे. मागील निवडणुकीत जेडीयू आणि राजद यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी राजदने सर्वाधिक जागा जिंकूनही नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं होतं, मात्र काही काळातच जेडीयू आणि राजद सरकार कोसळलं आणि जेडीयूने भाजपाच्या साथीने राज्यात सत्तास्थापन केली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाची ताकद बिहारमध्ये वाढताना दिसत आहे. भाजपा ६५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे तर जेडीयू ५१ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपा मोठा भाऊ बनत असल्याचं चित्र निकालाच्या कलावरून दिसत आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारTej Pratap Yadavतेज प्रताप यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपा