शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"बाबा रामदेव तर योगाचा कोका कोला"; भाजपा नेत्याच्या 'या' पोस्टची रंगली जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 19:36 IST

Bihar BJP President Sanjay Jaiswal Says Ramdev Yoga Guru Not Yogi : पश्चिम चंपारणमधून अनेकदा खासदार राहिलेल्या जायसवाल यांनी अ‍ॅलोपॅथीच्या मुद्द्यावरुन आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे.

नवी दिल्ली - बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय जायसवाल यांनी अ‍ॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संजय यांनी बाबा रामदेव यांना "ते योगी नाहीत योगाचे कोका कोला आहेत" असं म्हटलं आहे. पश्चिम चंपारणमधून अनेकदा खासदार राहिलेल्या जायसवाल यांनी अ‍ॅलोपॅथीच्या मुद्द्यावरुन आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे.

"मागील काही दिवसांपासून एक विचित्र स्पर्धा सुरू असल्याचं मला दिसत आहे. प्रत्येक वायफळ गोष्टीवर उत्तर देण्याची काही गरज नसते. तुम्ही फार व्यक्त झाल्यास ज्या व्यक्तीला फार महत्व द्यायची गरज नसते त्याला महत्त्व देता. सध्या आयएमएसुद्धा हेच करत आहे. बाबा रामदेव एक चांगले योगगुरू आहेत मात्र ते योगी नाहीत. योग अभ्यासाबद्दलच्या त्यांच्या ज्ञानासंदर्भात कोणीच प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मात्र आपल्या मेंदूसहीत सर्व अवयवांवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीला योगी म्हणतात. योग अभ्यास आयुष्यात खूप गरजेचा आहे कारण तो तुम्हाला निरोगी ठेवतो. पण योग काही चिकित्सा पद्धत नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हजारो वर्षांपासून आपल्याकडे उपचारांसाठी चरकसंहितेचा आणि सुश्रुतच्या शल्यक्रियेचा वापर करण्यात आला. हे कोण्या योगगुरुने केलेलं नाही" असं संजय यांनी म्हटलं आहे.

"बाबा रामदेव यांना मी मस्करीत योग शास्त्राचे कोका कोला आहेत असं म्हणतो. आपल्याकडे अनेक शतकांपासून शिकंजी आणि ठंडाईचा वापर शीतपेय म्हणून करण्यात आला. आता घरोघरी कोका कोला आणि पेप्सीने स्थान मिळवलं आहे. तशाच प्रकारे भारतामध्ये हजारो वर्षांपासून योग अभ्यास करणारे लोक होऊन गेले. त्यांनी भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीमध्ये मूलभूत बदल घडवून आणले. मात्र योग अभ्यासाला घरोघरी पोहचवण्यातील बाबा रामदेव यांचं योगदान नाकारता येणार नाही" असं देखील संजय जायसवाल यांनी म्हटलं आहे.

"मी आयएमएमधील माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की आपण फार महत्त्वाच्या नसणाऱ्या गोष्टींमध्ये स्पर्धा करुन आपली अनेक वर्षांची साधना वाया घालवू नये. कोरोनाच्या लढाईमध्ये जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हीच खरी श्रद्धांजली असेल" असंही संजय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीनंतर पुन्हा एकदा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

"रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात, तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतलेत"

महुआ मोईत्रा (TMC Mahua Moitra) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. "स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे. योगगुरु रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाBJPभाजपाIndiaभारतdoctorडॉक्टर