"राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 03:35 PM2020-10-28T15:35:57+5:302020-10-28T15:39:43+5:30

Narendra Modi And Bihar Election 2020 : राम मंदिराच्या उभारणीवरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.

bihar assembly elections 2020 first phase voting pm narendra modi darbhanga rally | "राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

"राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रॅली पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिराच्या उभारणीवरून त्यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. "राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे. 

नरेंद्र मोदी यांनी "गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या  थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे" असं म्हटलं आहे.

"जवळपास 90 लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मिळाली मुक्ती" 

"आज जवळपास 40 कोटी गरीबांची बँक खाती उघडली आहेत. आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत बिहारमधील जवळपास 90 लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे,” मोफत उपचार देण्याची घोषणाही केली होती. आज बिहारच्या प्रत्येक गरीब व्यक्तीला याचा लाभ मिळत आहे. कोरोनाच्या संकटात गरीबांना मोफत अन्नधान्य देणार असल्याचं म्हटलं होतं. ते देखील होत आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी मोदींनी सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना "व्होकल फॉर लोकल"चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा असं आवाहन देशवासीयांना केलं आहे. "जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारात कधी जायचं? नेमकी काय काय खरेदी करायची. विशेषत: लहान मुलांमध्ये याबाबत मोठा उत्साह असतो. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत. त्यात आपला विजय देखील निश्चित आहे असंही मोदी म्हणाले होते. 

Web Title: bihar assembly elections 2020 first phase voting pm narendra modi darbhanga rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.